शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जाताना झाला खून; बारामतीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:32 IST

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन गन्हेगाराच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला

सांगवी (बारामती) : स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य घेऊन निघालेल्या बारामती तालुक्यातील जळोची येथे जुन्या भांडणाच्या वादातून चार चाकी वाहनातून आलेल्या टोळक्याने बुधवारी रात्री गणेश धुळाबापु वाघमोडे (वय १७) या अल्पवयीन गुन्हेगार मुलाचा डोक्यात वर्मी घाव घालून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (वय ३९), धंदा फोटो ग्राफर (रा-अहिल्यादेवी चौक जळोची  ता.बारामती,जि. पुणे)यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहॆ.

जयेश बाळासाहेब माने,शुभम गायकवाड,करण जाधव,अविष गरुड,सोमनाथ जाधव, भोल्या व इतर सर्व (रा.बारामती) अशी खुनात सहभागी असलेल्या आरोपींची नावे आहेत. सातत्याने बारामतीत गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचे सत्र सुरू आसल्याने पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहॆ. बारामतीच्या पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक नसल्याने असे खून करण्यापर्यंत गुन्हेगारांचे धाडस वाढत आहॆ. बुधवारी २१ रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास  जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ हा खुनाचा थरारक घडून आला आहॆ.

जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी इनोव्हा गाडीतुन जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड,करण जाधव,अविष गरुड, सोमनाथ जाधव,भोल्या व इतर सहकाऱ्यांनी गेल्या वर्षी टी.सी. कॉलेज येथे गणेश धुळाबापु वाघमोडे याच्या सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन गणेश धुळाबापु वाघमोडे याच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. 

 गणेश वाघमोडे याच्यावर खून,  एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणे, अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गुन्हे करणे टोळी निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल आहेत. एक महिन्या नंतर गणेश अठरा वर्षांचा होणार होता. त्यानिमित्ताने तो स्वतःच्या वाढदिवसाची खरेदी करून घरी निघाला होता. यावेळी टोळक्याने त्याचा निर्घुण खून केला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी