आंबेगाव पठारावर तरुणाचा खून, डोक्यात कुऱ्हाडीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:12+5:302021-04-22T04:12:12+5:30

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पठार येथील साईनगर लेन एक येथे एका ...

Murder of a youth on Ambegaon plateau, stab in the head | आंबेगाव पठारावर तरुणाचा खून, डोक्यात कुऱ्हाडीने वार

आंबेगाव पठारावर तरुणाचा खून, डोक्यात कुऱ्हाडीने वार

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पठार येथील साईनगर लेन एक येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तपासाअंती मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना मृताची ओळख पडली आहे. हा खून वैयक्तिक वादातून झाला असल्याचे लक्षात घेता भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेची प्रत्येकी एक पथक आरोपीच्या मागावर गेले आहे.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ २, सागर पाटील, सहायक पोलीस सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर दाखल झाले होते.

Web Title: Murder of a youth on Ambegaon plateau, stab in the head