तरुणीची हत्या की आत्महत्या?; चौकशी करण्याची भाजप महिला मोर्चाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:54 IST2021-02-10T16:53:17+5:302021-02-10T16:54:31+5:30
Murder Or Suicide : आज महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांना निवेदन दिले.

तरुणीची हत्या की आत्महत्या?; चौकशी करण्याची भाजप महिला मोर्चाची मागणी
रविवारी पुण्यातील महंमदवाडी, हडपसर परिसरात एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पुजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही नक्की आत्महत्या आहे की हत्या ? याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली आहे. या बाबतची तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांना निवेदन दिले.
सदर प्रकरण झाल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी पुजाला उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीरपणे जखम झाल्यामुळे पुजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात असे समोर येत आहे की महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याच्या नातलगाच्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्माहत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर प्रकार हा अतिशय गंभिर असुन त्या साठी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्या कठोर शासन करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांनी वानवडी पोलिस ठाण्यात केली व पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई चालु करावी अन्यथा शहरभर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला मोर्चाने पोलिस प्रशासनाला दिला.