शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: दारु पिण्यावरुन झालेल्या वादात दगड डोक्यात घालून केला खून; काही तासातच आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 13:55 IST

दारु पित असताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. कोणतेही धागेदोरे नसताना बिबवेवाडी पोलिसांनी काही तासात गुन्हेगाराला जेरबंद केले.

पुणे : दारु पित असताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. कोणतेही धागेदोरे नसताना बिबवेवाडीपोलिसांनी काही तासात गुन्हेगाराला जेरबंद केले. शिवदत्त ऊर्फ डि ऊर्फ दत्तात्रय चंद्रकांत सकट (वय ३४, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. विशाल ओव्हाळ (वय २६, रा. पद्मावती वसाहत, पद्मावती) असे खून झालेल्याचे नाव आहे. महेश सोसायटी चौकातील राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या मागे पार्किंगमध्ये एका मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता बिबवेवाडी पोलिसांना कळविली. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला असता तो मृतदेह विशाल ओव्हाळ याचा असल्याचे निष्पन्न झाले. विशाल हा काही काम धंदा करीत नव्हता. तसेच तो मोबाईलही वापर नसल्याने त्याला कोणी फोन केले किंवा त्याने कोणाला फोन केले याचीही माहिती मिळू शकत नव्हती. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे कठीण झाले होते. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संतोष पाटील, शाम लोहमकर, गणेश दुधाने, पोलीस अंमलदार शिवाजी येवले, सचिन फुंदे यांनी संपूर्ण परिसरात तसेच ओव्हाळ याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. तपासादरम्यान विशालचे मित्र व नातेवाईक व घटनास्थळाजवळचे अस्पष्ट फुटेज व गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा खून शिवदत्त सकट याने केल्याचे कळाले. त्यानुसार पोलीस अप्पर ओटा परिसरात त्याचा शोध घेत होते. यावेळी शिवदत्त हा तेथील गॅस गोडावूनच्या दिशेने पायी चालत जात असताना दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पण पोलिसांना खात्री असल्याने त्याला बोलते केले. तेव्हा त्याने खूनाची कबुली दिली. 

विशाल हा कोणीही दारु पाजत असेल तर त्याच्याबरोबर जात असे. विशाल व शिवदत्त हे दारु पित बसले असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागात शिवदत्त याने दगड डोक्यात घालून त्याचा खून केला. शिवदत्त हा महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांनी सांगितले.

टॅग्स :BibvewadiबिबवेवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू