Murder of a sex worker in budhwar Peth of pune, her husband absconding on the throat by weapon | बुधवार पेठेत सेक्स वर्करचा मर्डर, गळ्यावर वार करुन पती फरार
बुधवार पेठेत सेक्स वर्करचा मर्डर, गळ्यावर वार करुन पती फरार

पुणे : घरगुती कारणावरुन पत्नीच्या गळ्यावर वार करुन तिचा खुन केल्यानंतर पती फरार झाला आहे. बुधवार पेठेतील जुना बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. मिना गब्बर काजी शेख (वय ३०) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे, तर तिचा पती इनामुल्ल मलीक शेख (वय ३२) असे तिच्या पतीचे नाव आहे. 

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी याबाबत सांगितले की, मिना व शेख हे दोघेही पश्चिम बंगालमधील राहणारे आहेत़ मिना ही गेल्या काही वर्षापासून वेश्या व्यवसा करीत होती़ गेल्या दीड महिन्यापासून बुधवार पेठेतील जुन्या बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरील एका खोलीत हे दोघे पतीपत्नी म्हणून रहात होते. शेख हा काही कामधंदा करीत नव्हता. त्यातून त्यांच्यात काही वेळा बाचाबाची झाली होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांमध्ये भांडणे झाली, तेव्हा रागाच्या भरात इनामल्ला शेख याने मिनाच्या गळ्यावर, पायावर चाकूने सपासप वार केले. मिनाचा आवाज ऐकून तेथे अनेक जण जमा झाले, हे पाहून हा शेख तेथून पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मिनाला तेथील मुलींनी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचे निधन झाले होते.
 
Web Title: Murder of a sex worker in budhwar Peth of pune, her husband absconding on the throat by weapon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

पुणे अधिक बातम्या

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का?

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का?

5 hours ago

पुण्यात सादरीकरणाचा अद्वितीय आनंद : महेश काळे

पुण्यात सादरीकरणाचा अद्वितीय आनंद : महेश काळे

14 hours ago

पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, ओढे नाले तुडूंब, पिकांना फटका

पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, ओढे नाले तुडूंब, पिकांना फटका

14 hours ago

बारामतीत बसपाच्या उमेदवाराची काळे फासुन काढली धिंड 

बारामतीत बसपाच्या उमेदवाराची काळे फासुन काढली धिंड 

15 hours ago

हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..

हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..

15 hours ago

पुण्यात आजही रात्री मुसळधार पाऊस ; राज्यात दिवाळीतही पावसाचा मुक्काम कायम 

पुण्यात आजही रात्री मुसळधार पाऊस ; राज्यात दिवाळीतही पावसाचा मुक्काम कायम 

16 hours ago