शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:53 IST

खून करून आरोपी बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले होते

चाकण : व्याजाच्या पैशांच्या वादातून बारामती तालुक्यात सावकाराचा खून करून पळालेल्या दोघांना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ (ता. खेड, जि. पुणे) गावाच्या हद्दीत डोंगरात लपून बसलेले असताना चाकण गुन्हे शाखेचे पोलिसांनी अटक केली आहे.  रोहित गाडेकर (वय २७ वर्षे,रा. मासाळवस्ती,सोरटेवाडी ता. बारामती) असे रोजी रात्री बारामती तालुक्यात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर खून करणारे सागर माने (वय२५ वर्षे ) आणि विक्रम मासाळ (वय.३० वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून सदरचा खून झाल्याची बाब समोर आली होती. सोरटेवाडी (कुलकर्णी चारी) येथे आरोपींनी रोहित गाडेकर यांच्या छातीवर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.

 गोपनीय खबऱ्यामार्फत चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, वडगाव निंबाळकर येथील रोहित सुरेश गाडेकर (रा. सोरटेवाडी ता. बारामती) याचा खून झाला होता, यातील अज्ञात आरोपी हे बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले आहेत. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे,सुनील भागवत,रेवन खेडकर, शरद खेरणार,महेश कोळी यांचे पथक बहुळ गावात पोहचले. पोलिसांना पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने गोठ्यातून पळून जाताना पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.संशयित आरोपी सागर आणि विक्रम यांनी सदरच्या खुनाच्या गुन्हयाची कबूली दिली आहे.

खून झालेला रोहित सुरेश गाडेकर याने आरोपीना दिलेल्या व्याजाच्या पैश्याचा तगादा लावून आरोपींना मारहाण करत होता. त्याच वादाच्या कारणावरून आरोपींनी कोयत्याने मारहाण करून रोहित गाडेकर यास जीवे ठार मारून खून केला असल्याची माहिती चाकण पोलिसांना दिली आहे. पुणे ग्रामीण मधील वडगाव निंबाळकर पोलिसांना या बाबत चाकण पोलिसांनी कळवले आहे. खुनाच्या घटनेतील संशयित आरोपी सुमारे १० वर्षांपूर्वी चाकण परिसरात वास्तव्यास होते, त्यामुळे त्यांना चाकण परिसराची माहिती होती. त्यामुळे त्यांनी खून केल्यानंतर लपण्यासाठी चाकण जवळील बहुळमध्ये येऊन आसरा घेतला होता. मात्र या दोन्ही आरोपींना चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जन्हाड व त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणBaramatiबारामतीDeathमृत्यूPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसArrestअटकMONEYपैसा