Pune | निमोणेत एकाचा खून; उसाच्या शेतात आढळून आला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:15 IST2023-02-06T14:14:02+5:302023-02-06T14:15:18+5:30

चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर, इ. शरीराच्या भागांवर गंभीर मारहाण करून त्यांचा निर्घृण खून...

Murder of one in Nimone dead body was found in a sugarcane field | Pune | निमोणेत एकाचा खून; उसाच्या शेतात आढळून आला मृतदेह

Pune | निमोणेत एकाचा खून; उसाच्या शेतात आढळून आला मृतदेह

निमोणे (पुणे) : येथे एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह आढळला असून या संदर्भात शिरूर पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात हकिगत अशी की, दि. ४ रोजी निमोणे (ता. शिरूर) येथील निमोणे-मोटेवाडीलगत गट क्र. ६१९ मधील उसाच्या शेतात हा मृतदेह आढळून आला. मनोहर चंदरराव शितोळे (वय ७२, रा. सांगवी सांडस, ता. हवेली) हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर, इ. शरीराच्या भागांवर गंभीर मारहाण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती त्यांचा मुलगा राजाराम शितोळे यांनी दिली .

दरम्यान, मृत मनोहर शितोळे यांचे निमोणे (ता. शिरूर) गावामध्ये अनेक नातलग आहेत. त्यामुळे त्यांचे नेहमी येणे-जाणे असे. आताही ते काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाइकांकडे आले होते. शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव अधिक तपास करत आहेत.

Web Title: Murder of one in Nimone dead body was found in a sugarcane field