धायरीत धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 05:53 PM2023-09-04T17:53:03+5:302023-09-04T17:54:28+5:30

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Murder of one by stabbing with a sharp weapon in Dhairit | धायरीत धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

धायरीत धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

googlenewsNext

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील रायकर मळा येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे.  गोपाळ कैलास मंडवे (वय :३२ वर्षे, रा. ओवी अंगण, जाधव नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ मंडवे हे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नीलायम टॉकीज समोर असलेल्या एमएसईबीच्या केशव पार्क उपविभाग कार्यालयात कामास होते. सोमवारी दुपारी दोन अज्ञात मारेकऱ्यांनी खंडोबा मंदिर रस्त्यावरील मनोहर गार्डन जवळ धारदार शस्त्राने मंडवे यांच्या मानेवर, छातीवर, मनगटावर वार करून खून केला. खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला आहे हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. घटनेचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.

Web Title: Murder of one by stabbing with a sharp weapon in Dhairit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.