अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:51 IST2022-02-08T13:50:58+5:302022-02-08T13:51:05+5:30

गंभीर गुन्हयानंतर आरोपी महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झाला.

Murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in yerwada | अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार

येरवडा : अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून लोहगाव येथे विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी गुलाम मोहम्मद शेख (वय 30, रा. पठारे वस्ती संत नगर लोहगाव, मूळचा रा. बिहार) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्हयानंतर आरोपी गुलाम याने महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झाला. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील मोझेआळी परिसरातील आरोपी गुलाम हा महिलेच्या घरात भाड्याने राहण्यास होता. दरम्यानच्या काळात त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर रिकामी करण्यास सांगितले. रविवारी दुपारी सदरची महिला घरात एकटीच असताना गुलाम याने घरात येऊन तिचा बाथरूम मध्ये गळा आवळून खून केला. 

सदर महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आला

खुनाच्या गुन्ह्यात नंतर घराला कुलूप लावून तो निघून गेला. सदर महिलेचा पती व मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. तिला संपर्क केला असता त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरुद्ध अनैतिक संबंधांना नकार दिल्यामुळे गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विमानतळ पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.

Web Title: Murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in yerwada