पुणे: दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच साडूच्या मदतीने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 11:00 IST2022-01-25T10:57:33+5:302022-01-25T11:00:59+5:30
मयत कप्तान सिंग हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे...

पुणे: दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच साडूच्या मदतीने केला खून
पुणे: दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच साडूच्या मदतीने गळा आवळून खून केला. त्यानंतर एका त्रयस्थ व्यक्तीने खून केल्याचा आरोप केला. परंतु पोलिसांनी कौशल्याने तपास करत सत्य समोर आणले आणि पत्नीसह साडूला गजाआड केले. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. कप्तानसिंग नायक (वय 37, रा. केशवनगर) असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. मुंढवा पोलिसांनी त्याची पत्नी अंजली कप्तानसिंग नायक उर्फ चव्हाण (वय 32) आणि साडू गजेंदर चित्तरसिंग नायक (36) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कप्तान सिंग हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. तर त्याची पत्नी अंजली सोलापूरची आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दोघेही मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत होते. मयत कप्तानसिंग याला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करत असे. अनेक वेळा त्याने पत्नीला मारहाण केली होती.
दरम्यान रविवारी देखील कप्तानसिंग हा दारू पिऊन घरी आला होता. त्याच्या रोजच्या दारू पिलेला आणि मारहाणीला कंटाळून पत्नी अंजलीने साडू गजेंदर चित्तरसिंग नायक याच्या मदतीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर काही वेळाने पती उठत नसल्याचा बनाव केला. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या घरमालकाच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला आरोपीने एका वेगळ्या व्यक्तीचे नाव घेत त्याने मारहाण करून खून केल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी पुन्हा एकदा तपास करून आरोपींना बनवून उघड पाडला आणि त्यांना अटक केली.