बारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा खून : आरोपी पोलिसांना शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:11 IST2018-11-05T19:09:50+5:302018-11-05T19:11:15+5:30
बारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा सोमवारी (दि. ५) भरदिवसा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला.
_201707279.jpg)
बारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा खून : आरोपी पोलिसांना शरण
बारामती : बारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा सोमवारी (दि. ५) भरदिवसा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांच्या स्वाधिन झाले.
शहरातील कवि मोरोपंत नाट्यगृह लगतच्या रस्त्याजवळ जाधव त्याच्या दुचाकीवर निघाला होता. यावेळी कच्च्या रस्त्यावरील वळणावर हल्लेखोरांनी अचानक जाधव याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये जाधव याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींसह एका मुलीचा समावेश असल्याची माहिती समजते. काही महिन्यांपूर्वी जाधव याच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यामध्ये तक्रार दाखल केलेल्या फिर्यादी मुलीचा हल्लेखोरांमध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.