Pune Crime: आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 07:55 IST2023-11-06T07:55:09+5:302023-11-06T07:55:34+5:30

टेम्पोतून मृतदेह व त्यांची दुचाकी आणून ती वाघोली परिसरातील खाणीत टाकून अपघाताचा बनाव केला....

Murder due to dispute over financial exchange, incident in Wagholi area | Pune Crime: आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना

Pune Crime: आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना

वाघोली (पुणे) : गोडाऊनच्या भाड्याचे पैसे मागितल्याने डोक्यात अवजड वस्तूचा घाव घालून खून केला. मयत व्यक्तीला त्याच्या दुचाकीसह खाणीत टाकून अपघात झाल्याचा बनाव केला. खून करणाऱ्या चौघांना लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

गणेश नाईक, लक्ष्मण नारायण इमनेलू मोनू व साजन अशी खून करणाऱ्यांची नावे आहेत. बाजीराव सुदाम खांदवे यांचा खून झाला होता.  खांदवे यांची जागा नाईक याने भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यावरून त्यांचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता.

खांदवे हे नाईक यांना भाड्याची रक्कम मागत होते. पैसे देतो, म्हणून नाईक याने खांदवे यांना त्या जागी बोलावले. नाईकने त्यांच्या डोक्यात घाव घालून तीन साथीदारांसह त्यांनी त्यांचा खून केला. टेम्पोतून मृतदेह व त्यांची दुचाकी आणून ती वाघोली परिसरातील खाणीत टाकून अपघाताचा बनाव केला.

Web Title: Murder due to dispute over financial exchange, incident in Wagholi area