पूर्वीच्या भांडणावरून तरुणांचा दगडाने ठेचून खून; सिंहगड पोलिसांनी तिघांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 11:27 IST2018-02-12T11:26:38+5:302018-02-12T11:27:55+5:30

जुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून त्याचा खून केला. ही घटना धायरी येथील गणेशनगरमध्ये पहाटे सव्वा दोन वाजता घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसानी तिघांना अटक केली आहे. 

murder in Dhayari, Pune, sinhagad Road Police arrested three | पूर्वीच्या भांडणावरून तरुणांचा दगडाने ठेचून खून; सिंहगड पोलिसांनी तिघांना केली अटक

पूर्वीच्या भांडणावरून तरुणांचा दगडाने ठेचून खून; सिंहगड पोलिसांनी तिघांना केली अटक

ठळक मुद्देजुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून अभिषेक पोकळेचा केला खूनसिंहगड रोड पोलिसानी तिघांना केली अटक

पुणे : दारू पीत बसले असताना जुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून त्याचा खून केला. ही घटना धायरी येथील गणेशनगरमध्ये पहाटे सव्वा दोन वाजता घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसानी तिघांना अटक केली आहे. 
अभिषेक बाळासाहेब पोकळे (वय २५, रा. नान्नज रेसिडेन्सी, धायरीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक पोकळेसह सुधीर श्रीमंत घुगे (वय २८, रा. लक्ष्मी विलास सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड), विशाल सेवकानंद वाघ (वय ३५, रा. मुरली हॉटेलजवळ, रायकर नगर, धायरी), विकास विश्वनाथ पोकळे (वय २६, रायकर नगर, धायरी) हे चौघे मित्र असून काल रात्री ते दारू पीत बसले होते. त्या दरम्यान त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वादावादी झाली. त्यातून नशेत तिघांनी अभिषेकला दगडाने मारून त्याचा खून केला. 
या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या भांडणावरून हा प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जगताप करीत आहेत. 

Web Title: murder in Dhayari, Pune, sinhagad Road Police arrested three

टॅग्स :Puneपुणे