वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली अपघात; टँकर घुसला मिठाईच्या दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 02:58 PM2017-12-29T14:58:33+5:302017-12-29T19:32:01+5:30

वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली एका सिमेंट टँकरचा भीषण अपघात झाला  आहे. अपघात इतका भीषण होता, की हा टँकर येथील मिठाईच्या दुकानात घुसला. 

Accident under Navale Bridge at Wadgaon Dhayari, pune; Tanker enters in a sweet shop | वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली अपघात; टँकर घुसला मिठाईच्या दुकानात

वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली अपघात; टँकर घुसला मिठाईच्या दुकानात

googlenewsNext
ठळक मुद्देसिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने तो थेट घुसला मिठाईच्या दुकानातअपघातात एका तरुणीचा मृत्यू तर दोन जण जखमी

पुणे : वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाऱ्या सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. हा टँकर सरळ विश्व आर्केड इमारतीमधल्या सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसल्याने टँकरच्या चाकाखाली येऊन तरूणीचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ट्ँकरचालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताची बातमी कळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 
स्वाती मधुकर ओरके (वय २९, रा. कर्वेनगर, मूळ पुलगाव, वर्धा) असे ठार  झालेल्या युवतीचे नाव आहे. ती संगणक अभियंता होती तर संदीप पाटील ( वय ३०,  वाल्हेकर कॉलनी, नऱ्हे) आणि सुनील बाळासाहेब साळुंखे ( वय ४१, भूमकरनगर, रा. नऱ्हे) अशी जखमींची नावे आहेत. प्रमोद मारूती कणसे ( वय ३०, मु. पो. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. 
लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सिमेंट घेऊन जाणारा टँकर कात्रजकडून येत होता. नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट समोरील विश्व आर्केड कॉम्पलेक्सच्या इमारतीमध्ये घुसला. दोन वाहनांना ठोकर मारत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. त्यावेळी तेथे स्वाती ओरके ही नाश्ता करण्यासाठी आली होती. दुकानाच्या जिन्यात महिला आणि दोन व्यक्ती अडकल्या. युवती भिंती आणि चाकाच्या मध्ये आली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला. युवती आणि तिघांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र युवती चाकाखाली आल्याने मरण पावली. दोघांना नवले रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर, स्टेशन आॅफिसर प्रकाश गोरे, सतीश डाकवे, राजेश वाझे, संदीप पवार, मनोज ओव्हाळ यांनी ही कामगिरी केली. वाहनचालकावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जगताप करीत आहेत. 

 

Web Title: Accident under Navale Bridge at Wadgaon Dhayari, pune; Tanker enters in a sweet shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे