शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापूर्वीच्या खुनाला फुटली वाचा! रागाच्या भरात पत्नीचा खून केलेल्या आरोपीने दिली मर्डरची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:58 IST

''जर तू आमच्या दोघांमध्ये आलास तर तो तुला देखील संपवून टाकेन, अशी धमकी दिली होती.."

पुणे : रागाच्या भरात पत्नीचा खुन केलेल्या पतीकडे करीत असलेल्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या धाग्यावरुन हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथील दीड वर्षापूर्वी झालेल्या खुनाची उकल करण्यात यश आले आहे.

हडपसर पोलिसांनी संतोष सहदेव शिंदे (वय २७, रा़ फुरसुंगी, मुळगाव चाकूर, जि़ लातूर) याला अटक केली आहे. संतोष शिंदे हा फुरसुंगी येथे अधूनमधून दारु पिण्यास जात असत. दशक्रियाविधी येथे नरसिंग विठ्ठल गव्हाणे (वय ६५, रा. जयभवानी चौक, फुरसुंगी) हाही तेथे गांजा व दारु पिण्यासाठी बसत होता. त्याला संतोष शिंदे येथे येणे आवडत नसे. तो त्याला तेथे बसून देत नव्हता. २९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिंदे हा तेथे दारु पिण्यास गेला असताना नरसिंग गव्हाणे हा अगोदरच आला होता. त्यांच्या भांडणे झाली. त्यात शिंदे याने तेथील विटेने व दगडाने मारहाण करुन गव्हाणे याचा खून केला होता. मात्र, हडपसर पोलिसांना दुसर्‍या दिवशी गव्हाणे याचा मृतदेह आढळून आला होता. परंतु, खून कोणी केला याचा तपास होऊ शकला नव्हता. 

सागर बाळु लोखंडे (वय २३) याने ७ मार्च रोजी आपली पत्नी शुभांगी लोखंडे (वय २१) ही घरी येत नसल्याच्या कारणावरुन पत्नीला चाकूने भोसकून तिचा खून केला होता. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड व इतर पोलीस अधिकारी सागर लोखंडे याचा पूर्वइतिहास जाणून घेत होते. शुभांगी याच्याबरोबर सागर याचे दुसरे लग्न होते. शुभांगी तिच्या पहिल्या नवर्‍याशी बोलत असल्याने त्याचा राग सागर याला येत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद होत होता. एकदा बोलता बोलता रागाच्या भरात शुभांगीने सागरला माझ्या नवर्‍याने यापूर्वी एक मर्डर केला आहे. 

जर तू आमच्या दोघांमध्ये आलास तर तो तुला देखील संपवून टाकेन, अशी धमकी दिली होती. सागर याला शुभांगीच्या पहिल्या नवर्‍याचे संतोष इतकेच नाव माहिती होते. तो फुरसुंगीला राहत असल्याची माहिती होती. 

पोलिसांनी शोध घेतल्यावर फुरसुंगी येथील दशक्रिया विधी येथे एका खुनाचा गुन्हा अद्याप उघड झाला नसल्याचे लक्षात आले. संतोष हा खून झाल्यानंतर फुरसुंगी येथे राहत नसल्याचे समजले. तो चिखली येथे बहिणीकडे राहायला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संतोष शिंदे याला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने नरसिंग गव्हाणे यांचा खून केल्याचे कबूल केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक