शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

आईला मारहाण केल्याचा राग अनावर न झाल्याने 'सख्या भावाकडून भावाचा खून'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 3:58 PM

अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला, आईस शिविगाळ व मारहाणही केली

ठळक मुद्देभावाच्या मारहाणीत भावाचा जागीच मृत्यू प्रथमदर्शनी हा खुनच वाटत आहे

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाडा येथे सख्या भावाने सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मासे शिजवून देण्यास नकार दिल्यामुळे हि घटना घडली आहे. या कारणावरून शंकर मारूती वाडेकर ( वय५५ ) यांचा राजेंद्र मारूती वाडेकर (वय ४५ )रा. वाडा (ता खेड ) यांने खून केला आहे. हि घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र वाडेकर याला पोलिसांनीअटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील वाडा येथे वाडेकर कुंटुंब राहत आहे. शंकर वाडेकर याने मासे बनवण्यासाठी वृद्ध आईला सांगितले होते. मात्र आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला. यांचा राग येऊन शंकर वाडेकर यांने आईस शिविगाळ व मारहाण केली.

शंकर वाडेकर यांचा सख्या भाऊ राजेंद्र वाडेकर याला हा प्रकार सहन न झाल्याने राग अनावर होऊन शंकर याला पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत शंकर वाडेकर याचा जागीच मूत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी हा खुनच वाटत आहे. शवविच्छेदन केल्यावरती नक्की काय प्रकार हे समजेल, असे खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी सुरू केला असुन राजेंद्र वाडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भारत भोसले करत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकKhedखेड