महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:10 IST2025-11-13T20:09:05+5:302025-11-13T20:10:01+5:30
- १४ नोव्हेंबर ऐवजी २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार; प्रारूप मतदार यादीला दोनदा मुदतवाढ

महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
पुणे :पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी तयार करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर ऐवजी २० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. अंतिम मतदारयादी १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामध्ये ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करावी, त्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविणे, योग्य हरकतींची दखल घेऊन मतदार यादीमध्ये बदल करणे, त्यानंतर मतदार केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर केलेला होता. यामध्ये १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती. त्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.
त्यानंतर प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. अंतिम मतदार यादी १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे.
असा आहे मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम
- प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना मागविण्यासाठी यादी प्रसिद्ध करणे : २० नोव्हेंबर २०२५
- प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०२५
- हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : ५ डिसेंबर २०२५
- मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान यादी जाहीर करणे : ८ डिसेंबर २०२५
- मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५