शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नगरसेवकांचा आलिशान थाट

By admin | Updated: July 29, 2016 03:55 IST

शहरातील नागरी, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन निवडून आले, महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले. नगरसेवक म्हणून मिरवत असताना, हातात महागडे मोबाइल दिसू लागले.

- नवनाथ शिंदे,  पिंपरी

शहरातील नागरी, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन निवडून आले, महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले. नगरसेवक म्हणून मिरवत असताना, हातात महागडे मोबाइल दिसू लागले. दिमतीला आलिशान मोटारी दाखल झाल्या. थाट वाढला; आश्वासनांचा मात्र त्यांना विसर पडला आहे़ त्यांच्या वागण्या-बोलण्यात झालेला बदल नागरिकांना सहज जाणवू लागला असून, मतदार म्हणून त्यांना आता पश्चात्तापाची वेळ आली आहे.उद्योगनगरीच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मतदारांनी नगरसेवकांना निवडून दिले़ नागरी विकासापेक्षा स्वत:च्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या काही नगरसेवकांना जनतेचा विसर पडला आहे़ अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे़ महापालिकेच्या आवारात नवनव्या आलिशान मोटारी सामान्य नागरिकांचे डोळे दिपवत आहेत. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यामुळे नगरसेवकांची चमकोगिरी वाढू लागली आहे़ (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांऐवजी अंगरक्षककाही वर्षांपूर्वी कार्यकर्ता म्हणून दुचाकीवर वॉर्डात फिरणारे नगरसेवक आता काळ्या काचेच्या मोटारीतून वार्डात फेरफटका मारताना दिसून येतात. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात नगरसेवकांची आलिशान गाडी थांबवली जाते़ पांढरे खादीचे कपडे, हातात महागडा मोबाइल, उच्च प्रतीचे मनगटी घड्याळ, गळ्यात सोन्याची साखळी, बोटांत अंगठ्या़,असा पेहराव अनेक नगरसेवकांचा आहे़ गाडीतून खाली उतरताच अंगरक्षक त्यांना गराडा घालतात़ थेट संवादाऐवजी सोशल मीडियाकामानिमित्त महापालिकेच्या आवारात आलेले नागरिक वॉर्डाचा नगरसेवक म्हणून भेटण्यासाठी पुढे जातात. परंतु थोडा वेळ थांबून त्यांच्याशी बोलण्यासाठी नगरसेवकांना वेळ नसतो. मोबाइलच्या स्क्रीनवर बोटे फिरवण्यात मग्न असल्यामुळे जनतेसोबत त्यांचा प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. त्यांचा जनसंपर्क कमी होत चालला आहे़ एका नगरसेवकांकडे दोनपेक्षा अधिक मोटारगाड्या असल्याचे नागरिक सांगतात.आलिशान मोटारींचे फॅडमर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, आॅडी, फॉर्च्युनर, टोयाटो लॅक्सेस, इनोवा, मान्झा, स्कॉर्पिओ अशा महागड्या एकासरस एक गाड्या वापरणारे नगरसेवक पिंपरी-च्ािंचवडमध्ये आहेत. अक्षरओळख नसलेल्या अनेक नगरसेवकांच्या हातात महागडे स्मार्ट फोन आहेत. केवळ वाहन बदलून नाही, तर एकूणच त्यांची जीवनशैली बदलली आहे.