पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी प्रोपिलीन वायू वाहणारा टँकर उलटला आणि काही मिनिटांत संपूर्ण महामार्गावर भीतीचे सावट पसरले. प्रोपिलीन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने हा केवळ वाहतूक अपघात नव्हता, तर संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा इशाराच होता. या अपघातापेक्षा त्या टँकरमध्ये असणाऱ्या प्रोपिलीन या वायूविषयी जास्त चर्चा झाली. तो प्रोपिलीन वायू नेमका काय आहे, याविषयी माहिती घेऊयात...
प्रोपिलीन हा पेट्रोकेमिकल उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा, मात्र तितकाच धोकादायक वायू आहे. रंगहीन, तीव्र ज्वलनशील आणि दाबाखाली साठवला जाणारा हा वायू आधुनिक औद्योगिक जगताचा कणा मानला जातो. प्लास्टिकपासून औषधांपर्यंत, रसायनांपासून रस्तेबांधणीपर्यंत प्रोपिलीनचा वापर सर्वत्र आहे. मात्र या उपयुक्ततेसोबतच त्याची जोखीमही तितकीच गंभीर आहे.
प्रोपिलीनचा सर्वाधिक वापर पॉलीप्रॉपलीन प्लास्टिक निर्मितीसाठी केला जातो. घरगुती साहित्य, पॅकेजिंग, वाहन उद्योग, वैद्यकीय उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत हे प्लास्टिक वापरले जाते. याशिवाय खते, औषधे, डिटर्जंट्स, रंग, रबर, रंगद्रव्ये तसेच काही ठिकाणी औद्योगिक इंधन म्हणूनही प्रोपिलीनचा वापर होतो. त्यामुळे देशातील रिफायनऱ्या आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये या वायूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते.
मात्र प्रोपिलीन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक, साठवण आणि हाताळणी करताना काटेकोर सुरक्षेची आवश्यकता असते. टँकर अपघात, गळती किंवा निष्काळजीपणा झाल्यास क्षणार्धात मोठी दुर्घटना घडू शकते. अलीकडेच महामार्गावर झालेल्या टँकर अपघाताने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
सुरक्षितता महत्त्वाची...
धोकादायक रसायनांची वाहतूक करताना वाहनांची तांत्रिक स्थिती, चालकांचे प्रशिक्षण, आपत्कालीन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाची तत्परता या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. केवळ उद्योगाच्या गरजा भागवणे पुरेसे नाही; तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही तेवढेच प्राधान्य देणे आवश्यक आहे.
Web Summary : Propylene, a crucial petrochemical, is highly flammable and widely used. Its transport poses risks, highlighted by a recent tanker accident. Safety during handling is paramount to prevent disasters. Driver training and emergency preparedness are crucial.
Web Summary : प्रोपिलीन, एक महत्वपूर्ण पेट्रोकेमिकल, अत्यधिक ज्वलनशील और व्यापक रूप से उपयोग किया जाता है। हाल ही में एक टैंकर दुर्घटना से उजागर हुआ कि इसके परिवहन में जोखिम हैं। आपदाओं को रोकने के लिए हैंडलिंग के दौरान सुरक्षा सर्वोपरि है। चालक प्रशिक्षण और आपातकालीन तैयारी महत्वपूर्ण हैं।