शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे महामार्गावर माणुसकीचं दर्शन; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून अन्न-पाण्याची मदत

By किरण शिंदे | Updated: February 4, 2026 16:35 IST

Mumbai Pune Expressway Traffic: या कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांना खाण्यापिण्यापासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पुणे पुणे - मुंबई महामार्गावर काल टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामुळे गेल्या पंधरा तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांना खाण्यापिण्यापासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अनेक प्रवासी काल रात्रीपासून महामार्गावर अडकून पडले असून लहान मुले, महिला, वृद्ध आणि आजारी प्रवाशांचे हाल होत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असतानाच, या कठीण परिस्थितीत मुंबई पुणे महामार्गावर कर्तव्यदक्ष पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडल्याचे पाहायला मिळाले.

लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश रामागिरे आणि लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आपल्या पोलिस स्टाफच्या मदतीने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांसह वाहनांमध्ये बसलेल्या प्रवाशांना बिस्कीट, पाणी आणि चिक्कीचे वाटप केले. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्यांनी स्वतः पुढाकार घेत ही मदत पोहोचवली.

गेल्या अनेक तासांपासून वाहतूक ठप्प असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात असला तरी, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपले कर्तव्य बजावत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः लहान मुलांना आणि वृद्ध प्रवाशांना अन्न व पाण्याची मदत मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Humanity on Mumbai-Pune Expressway: Police Help Stranded Travelers with Food, Water

Web Summary : Following a tanker accident on the Mumbai-Pune Expressway causing a massive traffic jam, police provided stranded travelers with biscuits, water, and snacks. Passengers, including children and the elderly, received relief amidst the challenging situation. Police efforts aimed to ease hardship and maintain order.
टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात