शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

‘मल्टी मोडल हब ’च्या प्लॅनमध्ये बदल होणार ? भुयार पाहण्यासाठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:14 PM

स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देमेट्रो स्थानकाच्या कामामध्ये ठरु शकतो अडथळापुरातत्व विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे या भुयारांच्या पाहणीकडे दुर्लक्ष

पुणे : महामेट्रोच्यावतीनेस्वारगेट येथे विकसित करण्यात येत असलेल्या मल्टी मोडल हब च्या जागेमध्ये आढळून आलेल्या भुयारामुळे मूळ आरेखनामध्ये (प्लॅन) बदल करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भुयारांचे नेमके करायचे काय असा प्रश्न मेट्रोच्या अधिकाऱ्यांपुढे आहे. स्थानकाच्या कामामध्ये या भुयाराचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वारगेट येथील अधिकाऱ्यांनी महामेट्रोकडून अभिप्राय मागविला आहे. 

स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. बुधवारी दुपारी आढळून आलेल्या भुयाराची माहिती गुरुवारपर्यंत बाहेर आलेली नव्हती. याबाबत मेट्रोकडूनही वाच्यता करण्यात आलेली नव्हती. ही माहिती हाती लागताच  ‘ लोकमत ’ ने भुयार सापडल्याची सविस्तर बातमी दिली.महामेट्रोने यासंदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. भुयारातील दगडी भिंतींचे बांधकाम नेमके कसले आहे आणि ते केव्हा करण्यात आले याबाबतची माहिती पालिकेकडे मागितली आहे. तब्बल 55 मीटर लांब आणि दीड मीटर रुंद असलेले एक भुयार आहे. त्याला दक्षिण बाजुने आलेल्या पाईपची जोड आहे. काहीजण हे ऐतिहासिक भुयार असल्याचे मत मांडत आहेत. तर काही जण स्वारगेट येथील जलतरण तलावासाठी या भुयाराद्वारे शेजारील कालव्यामधून पाणी आणण्यात आल्याचे सांगत आहेत. महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मेट्रोच्या पत्राला पालिका काय उत्तर देणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भुयारांची पाहणी करणे आवश्यक असतानाही दोन्ही विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकलेच नसल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले. ====शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणी पुणेकरांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली होती. येथील अधिकाऱ्यांनी संभाव्य गर्दी लक्षात घेता जास्तीचे जॅकेट्स आणि हेल्मेट्स आणून ठेवले होते. तरुणांपासून ते 60 वर्षीय आजीबाईंपर्यंत अनेकांना हे भुयार पाहण्याची इच्छा होती. मात्र, छोट्याशा खड्ड्यामधून जवळपास 15 फूट झाली उतरावे लागत असल्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना मनाई केली होती. मात्र, तरीही अनेकांनी केवळ खड्डा पाहूनच समाधान मानले.

टॅग्स :Swargateस्वारगेटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रो