आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्‍या मुकेश राठोडच्या आवळल्या मुसक्या

By विवेक भुसे | Updated: July 21, 2022 11:42 IST2022-07-21T11:40:10+5:302022-07-21T11:42:49+5:30

औरंगाबाद येथून राठोडला अटक करण्यात आली

mukesh rathod who cheated madhuri misal, was arrested | आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्‍या मुकेश राठोडच्या आवळल्या मुसक्या

आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्‍या मुकेश राठोडच्या आवळल्या मुसक्या

पुणे : आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदारमाधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्‍या मुकेश राठोड याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद येथून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आमदारमाधुरी मिसाळयांच्या कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्यासह चार महिला आमदारांना फसविण्याचा प्रयत्न मुकेश याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केला होता. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून तिचे मेडिकलकरीता पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडेही पैशांची मागणी करुन फसवणुकीचा प्रयत्न केला होता. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करीत आहेत.

Web Title: mukesh rathod who cheated madhuri misal, was arrested