शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त बंडखोरीचा!

By admin | Updated: September 27, 2014 07:21 IST

कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला

पुणे : कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला. इच्छुकांनी आपल्या पक्षातून संधी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला.जिल्हा बॅँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूर तालुक्यात आता हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे आणि भाजप-रासप युतीचे जगदाळे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. गेल्या वेळी जगदाळे यांनी अपक्ष म्हणून लढणारे भरणे यांना साथ दिली होती. याही वेळी महाआघाडीच्या माध्यमातून भरणे आणि जगदाळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आघाडी तुटल्याने भरणे यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार आहे. पुरंदरमधून राष्ट्रवादीचे राहुल शेवाळे यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे शिवतारे यांच्या विरोधात शेवाळे लढू शकतील. राष्ट्रवादीकडून बहुसंख्य इच्छुक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी ऐन वेळी उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन तावरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तावरे यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. शिवसेनेकडून जुन्नरमधून आशाताई बुचके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने येथील इच्छुक माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांना भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. माजी जि.प. सदस्य प्रसन्न डोके, शिवसेनेतील जुन्नरचे माजी नगराध्यक्ष सुनिल मेहेर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खेडमध्ये परिवर्तन आघाडी स्थापण्यात पुढाकार घेणारे शरद बुट्टे-पाटील हे युती फुटल्याचा निर्णय जाहीर होताच भाजपामध्ये गेले आहेत. शरद बुट्टे-पाटील हे राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य व कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती होते. तर, राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वेळी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली होती. दिलीप मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली होती. मावळमधील माऊली दाभाडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. शिरूरमधून राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. गेल्या वेळी बांदल अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपमधून राष्ट्रवादीत व पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)