पुणे : पुण्याच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने भामा आसखेड धरणामधूनपाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या जवळपास सव्वाशे जवानांना तैनात करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी रात्रीच दहा प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे शुक्रवारी हे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु झाले. महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे. या योजनेमधून शहराच्या पूर्वभागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुणे नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव. धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गेली अनेक वर्ष स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. जमिनीच्या बदल्यात जमीन अशी शेतकºयांची मागणी होती. शासनाने हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला जाहीर केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विरोध सुरुच ठेवला होता. पालिकेने नुकतेच मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी ५ कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. प्रकल्पाचे काम आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी १८५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 21:31 IST
भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली...
बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु
ठळक मुद्देमहापालिकेचे अधिकारी उपस्थित : प्रकल्पग्रस्तांकडून झाला नाही विरोधपोलिसी कारवाईचा उगारला बडगास्थानिक शेतकऱ्यांकडून निषेध