पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीतील बदल आणि विविध मागण्यांवरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवलेल्या विद्यार्थ्यांनी काल (शुक्रवार) रात्री पुण्यात मोठं आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर आज सकाळी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बागेतील कार्यालयात भेट घेतली.या भेटीत विद्यार्थ्यांनी आपले सर्व मुद्दे आणि मागण्या शरद पवारांसमोर मांडल्या. जवळपास अर्ध्या तास चाललेल्या चर्चेत पवारांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि लगेचच एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना थेट फोन केला.
MPSC protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची शरद पवारांकडे धाव, आयोग अध्यक्षांशी साधला फोनवरून संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:46 IST