MPSC protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची शरद पवारांकडे धाव, आयोग अध्यक्षांशी साधला फोनवरून संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:46 IST2025-04-12T10:36:26+5:302025-04-12T10:46:58+5:30

एमपीएससी परीक्षा पद्धतीतील बदलाबाबत शरद पवारांची विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा

MPSC protest MPSC students meet Sharad Pawar, assure the commission chairman over phone | MPSC protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची शरद पवारांकडे धाव, आयोग अध्यक्षांशी साधला फोनवरून संवाद

MPSC protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची शरद पवारांकडे धाव, आयोग अध्यक्षांशी साधला फोनवरून संवाद

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीतील बदल आणि विविध मागण्यांवरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवलेल्या विद्यार्थ्यांनी काल (शुक्रवार) रात्री पुण्यात मोठं आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर आज सकाळी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बागेतील कार्यालयात भेट घेतली.

या भेटीत विद्यार्थ्यांनी आपले सर्व मुद्दे आणि मागण्या शरद पवारांसमोर मांडल्या. जवळपास अर्ध्या तास चाललेल्या चर्चेत पवारांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि लगेचच एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना थेट फोन केला.



फोनवरून झालेल्या संवादात रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांना भेटण्याची वेळ दिली असून, त्यांच्या सर्व प्रश्नांची सकारात्मक मार्गाने सोडवणूक केली जाईल, अशी माहिती त्यांनी शरद पवारांना दिली. विद्यार्थ्यांच्या या भेटीमुळे आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, आता आयोगाकडून येणाऱ्या निर्णयाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे.

Web Title: MPSC protest MPSC students meet Sharad Pawar, assure the commission chairman over phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.