MPSC exam : कृषी सेवा मुख्य परीक्षेत ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र;सहा महिन्यांनी होणार निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:47 IST2025-12-26T10:47:31+5:302025-12-26T10:47:47+5:30

- एमपीएससीने १८ मे रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेतली होती.

MPSC Exam 827 candidates eligible for interview in Agricultural Services Main Examination | MPSC exam : कृषी सेवा मुख्य परीक्षेत ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र;सहा महिन्यांनी होणार निकाल जाहीर

MPSC exam : कृषी सेवा मुख्य परीक्षेत ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र;सहा महिन्यांनी होणार निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले असून, त्यातील ५२० उमेदवार पुण्यातील आहेत. प्रशासकीय कारणास्तव तीन उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा सविस्तर मुलाखत कार्यक्रम www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयाेगाने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सेवा संवर्गातील २५८ पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे एकूण ८२८ पदांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. एमपीएससीने १८ मे रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेतली होती.

राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर होऊन मुलाखतीदेखील पूर्ण होऊन तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्या. कृषी सेवेचे मात्र निकालच रखडले हाेते. अखेर एमपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. मात्र, उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

दरम्यान, पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये मिळाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या, समांतर आरक्षणाच्या, इतर मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

---------

पात्र उमेदवार :

अमरावती - ४६

छत्रपती संभाजीनगर - १०३

नागपूर - ४३

नाशिक - ९७

नवी मुंबई - १८

पुणे - ५२० 

Web Title : MPSC कृषि सेवा परीक्षा: 827 उम्मीदवार साक्षात्कार के लिए उत्तीर्ण।

Web Summary : MPSC कृषि सेवा मुख्य परीक्षा 2024 के परिणाम घोषित। 827 उम्मीदवार साक्षात्कार के लिए उत्तीर्ण हुए। साक्षात्कार कार्यक्रम MPSC वेबसाइट पर प्रकाशित किया जाएगा। परिणाम न्यायालय के निर्णयों पर निर्भर करता है।

Web Title : MPSC Agri Services Exam: 827 Candidates Qualify for Interview.

Web Summary : MPSC Agri Services Main Exam 2024 results declared. 827 candidates qualified for interviews. The interview schedule will be published on the MPSC website. Result depends on court decisions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.