शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आचारसंहिता धाब्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 11:47 AM

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये दोन नगरसेवकपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे.

ठळक मुद्देसमाविष्ट गावांच्या प्रश्नासंदर्भांत थेट महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकबैठकीला काही इच्छुक उमेदवार देखील उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांची सारवासारव 

पुणे: महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये दोन नगरसेवकपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. येत्या ६ मे अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यामुळे या गावांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. समाविष्ट गावांमध्ये आचारसंहिता सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या गावांतील विविध प्रश्ना संदर्भात सोमवारी (दि.३) रोजी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह महापालिकेचे इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन जागांसाठी इच्छुक असलेले काही उमेदवार देखील बैठकीला उपस्थित होते.     राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील विविध महापालिकांमधील पोटनिवडणुकासह पुणे महापालिकेच्या प्रभाग ४२-अ आणि ४२-ब या या समाविष्ट गावांतून दोन नगरसेवक पदाची देखील निवडणूक जाहिर केली आहे. आयोगाने २४ जून रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, तेव्हा पासून या गावांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये ३० जून ते ६ मे अखेर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. या दोन जागांसाठी २३ मे रोजी मतदान होणार असून, २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये आचारसंहिता सुरु असताना सोमवार (दि.३) रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मिळकत कराच्या अडचणी, रस्ते, ड्रेनेजचे प्रश्ना संदर्भांत बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर याच्यासह अनेक अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शहर अध्यक्ष चेंतन तुपे, नगरसेवक सायली वांजळे, सचिन दोडके यांच्यासह समाविष्ट गावांमधील इच्छुक उमेदवार देखील बैठकीला उपस्थित होते.    बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी समाविष्ट गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतही सुविधा उपलब्ध नाही, अनेक गावांमध्ये महापालिकेच्या पाण्याची साधी पाईपलाईन देखील टाकलेली नाही तरी देखील १७०० रुपयांची पाणी पट्टी लावली आहे, रस्ते, ड्रेनेज कोणत्याही सुविधा देत नसताना दोन वर्षांपासून टॅक्स वसुल करत आहे, कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिला जात नसतान टँक्स, पाणी पट्टी का द्यायची असा सवाल उपस्थित देखील उपस्थित केले. गावांच्या पिण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी देखील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी केली.    ---------------------महापालिका अधिकाऱ्यांची सारवासारव महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आचारसंहित लागू झाली असताना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत गावांच्या विविध प्रश्नावर चर्चा देखील करण्यात आली. याबाबत महापालिकेचे निवडणूक अधिकारी संतोष भोर यांना विचारले असता त्यांनी सुळे यांनी निवडणुका जाहीर झालेली गावे सोडून अन्य प्रश्नावर बैठक घेतल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSupriya Suleसुप्रिया सुळेElectionनिवडणूक