शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 13:38 IST

मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती

दौंड : दौंड येथे आई आणि मुलीच्या भांडणात आईने मुलीला लाथा बुक्क्याने मारून तीचा खून केला असल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत दीक्षा हरिओम जागिंड ( वय १८, राहणार डिफेन्स कॉलीनी, रेल्वे वसाहत  दौंड) असे मुलीचे नाव आहे. 

सरिता हरीओम जागिंड (  वय ४०)  या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील हरिओम जागिंड यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.  आई आणि मुलगी यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला आणि त्यातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ओम हरीओम जांगिड हे मूळचे राजस्थानी येथील असून ते रेल्वेच्या नोकरी निमित्ताने दौंड येथे  वास्तव्याला आहे. खून झालेली मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. या संदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूEducationशिक्षण