शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

आई व पोटातील बाळाला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST

काही दिवसांपूर्वी २१ वर्षीय गर्भवती महिलेचा चालत्या दुचाकीवरुन पोटावर पडुन अपघात झाला. महिलेला तात्काळ ससून सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात ...

काही दिवसांपूर्वी २१ वर्षीय गर्भवती महिलेचा चालत्या दुचाकीवरुन पोटावर पडुन अपघात झाला. महिलेला तात्काळ ससून सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्त्रीरोग व शल्यतंत्रज्ञ यांनी तपासणी केली असता पोटावर बेंबीजवळ एका जखमेतून आतड्यांचा काहीसा भाग बाहेर आलेला आढळून आला. बाळाच्या ह्रदयाचे ठोके अजूनही ऐकू येत होते. डॉक्टरांना पोटामध्ये रक्तस्त्राव झाल्याची शक्यता वाटल्याने तात्काळ सोनोग्राफी करुन महिलेला आॅपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले.

स्त्रीरोगतज्ज्ञांनी प्रथम सिझेरीयन करुन २१०० ग्रॅम वजनाचे बाळ सुरक्षित बाहेर काढले व नंतर शल्यतंत्रज्ञांनी ओमेंटम (आतड्याचा काही भाग) चा बाहेर आलेला भाग काढून टाकला. पूर्ण आतडे व पोटातील इतर अवयवांची तपासणी केली असता गर्भाशयाच्या पिशवीवर दोन ठिकाणी जखमा आढळून आल्या. बाळाच्या कमरेवरही दोन ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत.

शस्त्रक्रियेमध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉ. शिल्पा नाईक, डॉ. तेजस्विनी काळे, डॉ. स्नेहल तिनईकर आदींनी स्त्रीरोग व प्रसुती विभाग प्रमुख डॉ. रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. शल्यतंत्रज्ञ टीम डॉ. किरण जाधव यांच्यासह डॉ. दयानंद, डॉ. मनोज यांनीही यासाठी परिश्रम घेतले. डॉ. आरती किणीकर यांच्या चमुने नवजात बाळावर उपचार केले, असे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.