पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:35 IST2025-12-19T13:34:51+5:302025-12-19T13:35:41+5:30
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या ६००पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटानेही इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले होते. पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा गुरुवार अखेरचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत. त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पश्चिम विभागाचे शहरप्रमुख सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष रुपाली पाटील - ठोंबरे यांनी सांगितले.