शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळाला ६० टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देणार; चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर होताहेत तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:39 IST

चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर शेतकरी असल्याने संख्या अजून वाढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले

पुणे: प्रस्तावित पुरंदरविमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध म्हणून सात गावांतील शेतकऱ्यांच्या हरकतींचा पाऊस पाडला असला, तरी संमती देणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे. विमानतळाची अधिसूचना जारी होण्यापूर्वी या सातही गावांमधील सुमारे ६० टक्के जमिनींची विक्री झाली होती. या सर्व शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमीन देण्याची संमती दर्शविली असून, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पॅकेजमुळे आणखी शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, वनपुरी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि उदाचीवाडी या सात गावांमधून २ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यानुसार, भूसंपादनाच्या ३२ (२) या नोटिसा जारी करण्यात आल्या. त्या नोटिसांनंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका महिन्याची मुदत दिली होती. त्यानुसार, २३ मेपासून शेतकऱ्यांनी हरकती नोंदविण्यास सुरुवात केली. सात गावांमधून ३० मेअखेर २ हजार ५२ हरकती मुदतीत नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पारगाव गावांमधून ७४७ इतक्या सर्वाधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात या हरकतींवर सुनावणी होणार आहे.दरम्यान, जमीन देण्यास संमती देणारे पत्रही जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. संमती देणाऱ्यांची संख्याही आता वाढत असून, विमानतळाबाबत हे सकारात्मक पाऊल पडत असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

विमानतळासाठी जमीन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विमानतळाची अधिसूचना जारी होण्यापूर्वी सुमारे ६० टक्के जमिनींची विक्री झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या सर्व शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. या जमिनीचे संपादन करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर, भूसंपादनाचा मोबदला चांगला मिळेल, या आशेवर अनेक शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही संख्या अजून वाढेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी तोंडी संमती देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे संमती देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लवकरच आणखी लेखी स्वरूपात संमतीचे पत्र येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. पॅकेजबाबत राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा पूर्ण झाली असून, लवकरच त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरीfarmingशेतीMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार