शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा; आमिष दाखवून २३ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 28, 2024 17:47 IST2024-01-28T17:46:55+5:302024-01-28T17:47:24+5:30
गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितल्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा; आमिष दाखवून २३ लाखांची फसवणूक
पुणे: सोशल मिडीयावर झालेली सायबर चोरट्याची ओळख एकाला महागात पडली आहे. शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नादात अवघ्या दोन महिन्यात तब्बल २३ लाख ६६ हजार रुपये गमविले आहे.
याप्रकरणी गणेश रमेश सोनावणे (वय-४१, रा. वडगाव बुद्रुक) यांनी शनिवारी (दि.२७) सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुप वरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यानचा काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी सायबर चोरट्याने सोनावणे यांच्या व्हॅट्सऍपवरून संपर्क साधला. तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक शिकवण्याचा बहाणा केला. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितले. त्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. आणखी पैसे मिळतील असे आमिष दाखवून सोनावणे यांना २३ लाख ६६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी सिंहगरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजूरकर करत आहेत.