शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुणे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा व चोरीमध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 8:31 PM

दौंड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील वाळू चोर महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या एक पाऊल पुढेच

ठळक मुद्देवाळू चोरी रोखण्यासाठी केवळ औपचारिक प्रयत्न वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल

पुणे : पर्यावरणाच्या परवानग्या मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात वाळूचे लिलावच होऊ शकले नाही. जिल्हा प्रशासनाकडून वाळू लिलाव जाहिर होत नसले तरी सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वच तालुक्यांमध्ये अनधिकृत वाळू उपसा व वाळू चोरी सुरुच आहे. ही वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न व उपाययोजना केवळ औपचारिकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील प्रामुख्याने दौंड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील वाळू चोर महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या एक पाऊल पुढेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवार (दि.१५) रोजी हवेली आणि शिरुर तालुक्यातील वाळू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र आढावा बैठक घेतील. यावेळी शिरुरचे आमदार अशोक पवार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी दौंड तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी देखील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना बैठक घ्यावी लागली होती. एवढे सर्व करूनही वाळू चोरांना लगाम बसलेला नाही अद्यापही वाळू चोरी होत असून त्यामागे महसूल पोलिस प्रशासनातील अधिकारी यांचे लागेबांधे असल्याचेही दिसून आले आहे.बुधवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले. ते म्हणाले, अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी ज्या गावात वारंवार वाळू चोरीचे प्रकार घडत आहेत, अशा गावांची व वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी तयार करावी. पोलीस स्टेशन निहाय भरारी पथके तयार करावीत. तसेच तपासणीसाठी चेकपोस्ट तयार करावेत. वाळू चोरीचे प्रकार आढळून येणाऱ्या भागांतील संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी.

टॅग्स :PuneपुणेsandवाळूPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी