मेथीने बनविले शेतकऱ्याला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:15 PM2019-11-22T12:15:20+5:302019-11-22T12:17:00+5:30

अतिवृष्टीने मेथी, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाल्याने तुटवडा

More earning from Fenugreek crops to farmer | मेथीने बनविले शेतकऱ्याला लखपती

मेथीने बनविले शेतकऱ्याला लखपती

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण ६० किलो मेथी उत्पादनासाठी पाच हजार शंभर रुपये खर्च

मंचर : अतिवृष्टीने मेथी, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाल्याने तुटवडा भासत आहे. परिणामी, दोन्ही पिकाचे बाजारभाव कडाडले आहेत. भाववाढीचा मोठा फायदा सातगाव पठार भागातील भावडी येथील अशोक बाजारे यांना झाला आहे. 
बटाटा पिकानंतर मेथीचे पीक घेणारे बाजारे यांना या पीकाने लखपती बनवले आहे. बाजारे यांच्या शेतात येऊन व्यापारी मेथी खरेदी करीत आहेत. आंतरपीक म्हणून मेथीत काकडीचे पीक घेतले आहे. त्याचेही त्यांना भरघोस उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. 
कमी दिवसांत व कमी भांडवलात येणारी मेथी, कोथिंबीर ही पिके शेतकरी वर्षातून अनेकवेळा घेतो. या पिकांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढला आहे. या वर्षी पावसाने चांगलाच तडाखा दिला. अतिवृष्टीने मेथी, कोथिंबीर या पिकांना फटका बसला. असे असले तरी काही शेतकऱ्यांनी यशस्वी पीक घेतले आहे. 
सातगाव पठार भाग बटाटा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. सुमारे सहा हजार एकर क्षेत्रात बटाटा लागवड होते. बटाटापीक काढल्यानंतर पिकाचा फेरपालट म्हणून अनेक शेतकरी मेथी, कोथिंबिरीचे पीक घेतात. हा भाग पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. रब्बी हंगामात पाणीटंचाई जाणवते. म्हणूनच कमी दिवसांत येणारी भाजीपाला पिके घेतली जातात.
........
एकूण ६० किलो मेथी उत्पादनासाठी पाच हजार शंभर रुपये खर्च आला. बटाटापिकाच्या काढणीनंतर हे मेथीपीक घेतले. एकदा खताची मात्रा दिली, तर दोनदा औषध फवारणी केली आहे. एक किलो मेथीतून ८० ते १०० जुड्या निघतात. शेकडा २,५०० ते ३,००० रुपये भाव मिळत असल्याने मेथीपिकाचे चांगले उत्पन्न मिळत आहे. एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.- अशोक बाजारे, मेथी उत्पादक, भावडी 
..........
४सातगाव पठार भागातील 
भावडी येथील शेतकरी अशोक बाजारे यांनी सहा एकर 
क्षेत्रात मेथीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. शेतातील बटाटा 
पीक निघेल, तस-तशी वेळोवेळी मेथी शेतात टाकली. चारशे किलो मेथी बी बाजारे यांनी शेतात टाकले. पिकाला बी, औषधे व खते हाच खर्च आला. पीक जोमदार आल्याने व्यापाºयांनी शेताच्या बांधावर येऊन  खरेदी केले. 
४शेवटचे ६० किलो मेथी बाजारे यांनी एक लाख पाच हजार रुपयांना दिले. व्यापारी शेतातील मेथी काढून ती बाजारात नेत असल्याने वाहतुक खर्च वाचला आहे. थोड्या दिवसात चांगले उत्पादन निघत असल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून सातगाव पठार भागातील शेतकरी मेथी, कोथिंबीर पीक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.  
४भागातील वातावरण या पिकाला पोषक असून दोन्ही पिकांनी शेतकºयांना चांगलाच आधार दिला आहे.बाजारे यांनी मेथीत आंतर पीक म्हणून काकडी 
घेतली आहे.

Web Title: More earning from Fenugreek crops to farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.