शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत उदघाटनाला ५० हुन अधिक नगरसेवक अन् राजकीय नेते; कोरोना नियमांना तुडवले पायदळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 10:57 IST

सामान्य माणसाला नियमांचे पालन करायला लावणाऱ्या नगरसेवक आणि राजकीय नेत्यांनी कोरोना नियमांना तुडवले पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकासकांमाची उद्घाटने उरकण्यात आली. पिंपळे गुरव येथील जगताप डेअरी चौकातील आणि सुदर्शन नगर येथील ग्रेड सेपरेटर, बिजलीनगर येथील भुयारी मार्ग,  वाकड ते नाशिक फाट्याकडे  ग्रेड सेपरेटर डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटर, प्रभाग क्र. २९ मधील श्रीमती शेवंताबाई खंडूजी जगताप माध्यमिक शाळा क्र. ५८ चे विस्तारीकरण आदी विकासकामांची उदघाटने झाली. त्यावेळी सर्वच ठिकाणी पन्नासहून अधिक नगरसेवक आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तर फिजिकल डिस्टन्स आणि काहींनी मास्कही अर्धवट लावल्याचे दिसून आले. सामान्य माणसाला नियमांचे पालन करायला लावणाऱ्या नगरसेवक आणि राजकीय नेत्यांनी कोरोना नियमांना तुडवले पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले. 

पिंपरी - चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर पिंपळे सौदागर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. तर भाजपाने थेरगाव येथील उद्घाटनाबाबत राजकारण केल्याने शिवसेनेने बहिष्कार टाकला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक या महिन्यात जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या वतीने आज विविध विकासकामांची उद्घाटने करण्यात आली.

राष्ट्रवादीने उरकले उद्घाटन

पिंपळे सौदागर जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन अकराला होणार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ते सकाळी साडे नऊलाच उरकून टाकले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते. त्यानंतर भाजपाने त्याच ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साडे अकराला उद्घाटन केले.

 शिवसेनेचा  बहिष्कार

थेरगाव येथील डांगे चौक येथे  ग्रेडसेपर उभारला आहे. भाजपाने थेरगाव येथील उद्घाटनाबाबत राजकारण केल्याने शिवसेनेने बहिष्कार टाकला. शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, नगरसेवक निलेश बारणे अनुपस्थित होते. शिवसेना शहरप्रमुख भोसले म्हणाले, ‘‘महापालिकेचा कार्यक्रम असताना सत्ताधारी भाजपाने यात राजकारण केले. महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपाचे झेंडे होते.  त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला होता.’’

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या