पुणे जिल्ह्यात साथीच्या आजारांचे होणार मॉनिटरिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:41 PM2019-12-25T13:41:39+5:302019-12-25T13:53:09+5:30

या उपक्रमाद्वारे आरोग्य विभागाच्या विविध सॉफ्टवेअर एकत्रित करण्यात येणार

Monitoring of epidemic disease will doing in the Pune district | पुणे जिल्ह्यात साथीच्या आजारांचे होणार मॉनिटरिंग

पुणे जिल्ह्यात साथीच्या आजारांचे होणार मॉनिटरिंग

Next
ठळक मुद्देएकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम १ तारखेपासून होणार सर्वेक्षणास सुरुवातआरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरूजिल्ह्यात या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात

पुणे : साथींच्या आजारांची एकत्रित माहिती घेण्यासाठी तसेच त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, आरोग्य कर्मचारी गावोगावी घरी जाऊन आजारांची माहिती घेऊन या अ‍ॅप्लिकेशनवर माहिती अपलोड करणार आहे. त्याद्वारे रोगांचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून, आठ तालुक्यांत हे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे . १ तारखेपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
दरवर्षी वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार पसरत असतात. अचानक आलेल्या आजारामुळे उपाययोजना करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे केंद्र सरकातर्फे एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे आरोग्य विभागाच्या विविध सॉफ्टवेअर एकत्रित करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत असून, पुणे जिल्ह्यातही त्याचे काम सुरू झाले आहेत. साथीच्या आजारांची माहिती घेण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. मोबाईल 
आणि टॅबवर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून आरोग्य कर्मचाºयांना ते देण्यात येईल. 
घरोघरी जाऊन हे कर्मचारी आजारांबाबत माहिती घेऊन तत्काळ त्याची माहिती या अ‍ॅप्लिकेशनवर अपलोड करणार आहेत. तालुका आणि जिल्हा स्तरावरील माहिती एकत्र करून ती राज्यस्तरावर पाठविण्यात येणार आहे. तर, राज्यस्तरावरील माहिती केंद्रस्तरावर पाठविण्यात येईल. याद्वारे भविष्यात आरोग्य विभागाची एकत्रित माहिती गोळा करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार म्हणाले, ‘‘या अ‍ॅप्लिकेशनबाबत जिल्ह्यात आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात 
झाली आहे. आतापर्यंत आठ तालुक्यांत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. एक तारखेपासून जिल्ह्यातील ५३९ आरोग्य केंद्रे अणि ९० उपकेंद्रांद्वारे हे सर्वेक्षण गावोगावी करण्यात येणार आहे. येत्या १ तारखेपासून या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येईल.
.........
उपक्रेंद्र स्तरावर एक मोबाईल आणि टॅबलेटद्वारे आरोग्यसेविका-सेवक तसेच आशा सेविकांमार्फेत हे सर्वेक्षण गावोगावी राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन माहिती घेऊन मोबाईलद्वारे एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम अ‍ॅप्लिकेशनवर ही माहिती लगेच अपलोड करण्यात येईल. तसेच, जिओ टॅगिंगही करण्यात येईल. 
४दिवसाला १०० घरे, असे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असून, महिन्यातून दोनदा सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. या सर्वेक्षणाचा ट्रेंड समजून भविष्यात येणाºया आजारांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. 
.........
साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. येत्या १ तारखेपासून याला सुरवात होणे अपेक्षित आहे.- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.
......
देशात सात राज्यांत उपक्रम सुरू
४एकात्मिक आरोग्य सर्वेक्षण उपक्रम देशात सात राज्यांत सुरू करण्यात आला आहे. याद्वारे साथीच्या आजारांवर लक्ष ठेवण्यात येईल. भविष्यात संपूर्ण देशात हा उपक्रम लागू केला जाणार आहे.
......

Web Title: Monitoring of epidemic disease will doing in the Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.