शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

समाधीवरचे पैसे खिशात! आळंदीत पुजारी, कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; देवस्थानची कारवाई, शिकवला चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:33 IST

गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या, पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असेही काही प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद

भानुदास पऱ्हाड

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्यासंत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरातील शिपाई व पुजारी यांच्यावर गैरवर्तन प्रकरणी आळंदी देवस्थानच्या व्यवस्थापनाने माफीनामा लिहून घेत संबंधितांना घरचा रस्ता दाखविला आहे. आळंदी देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत. गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या. तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असेही काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. मात्र, समज देऊन हलकी फुलकी कारवाई करून त्यांना सोडले जात होते.          दोन दिवसांपूर्वी एक कर्मचारी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेऊन मंदिरात आला. कार्यालयातील एकाला तो दमदाटी करत होता. तसेच, उलटसुलट बोलत होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास व्यवस्थापनाने तंबी देऊन घरी बसवले. अन्य दुसऱ्या घटनेत मागील तीन आठवड्यांपूर्वी एक पुजारी माउलींच्या समाधीसमोर बसलेला असताना भाविकाने समाधीवर ठेवलेले पैसे दानपेटीत न टाकता खिशात ठेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले होते. संबंधित पुजाऱ्याकडून देवस्थानने माफीनामा लिहून घेतला आहे. शिपाई पुरुषोत्तम डहाके यांनी मद्यप्राशन करून मंदिरात गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुजारी यशोदीप जोशी यांच्याकडून झाल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून घेतला असल्याचे देवतांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. 

देवस्थानच्या व्यवस्थापकांनी दोन्ही घटनांची माहिती दिली. याबाबत संबंधित मद्यप्राशन केलेला शिपाई आणि समाधीवरील पैसे खिशात घालणारा पुजारी यांना सर्व विश्वस्तांशी चर्चा करून निलंबित केले जाईल. अन्य कोणी असे प्रकार करू नयेत, यासाठी ही कारवाई लवकरच केली जाईल. यापूर्वीही मद्यप्राशन करून कामावर आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कायमस्वरूपी घरी बसवले आहे.  - योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरPuja Vidhiपूजा विधीMONEYपैसाSocialसामाजिकTempleमंदिर