शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलींशी लग्न लावण्यासाठी उकळले पैसे,अज्ञातावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:54 IST

अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सोलापूर या भागातील शेकडो तरुणांची फसवणूक झाली

सासवड : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सोलापूर या भागातील शेकडो तरुणांची फसवणूक झाली असून, त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्यात आले आहेत. ही गंभीर बाब लक्षात येताच ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सासवड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध आयपीसी ३१९ (२), ३१८ (४), ३५६ (२), ६६ (ड) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अनाथांची माय पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलींसाठी १९९३ साली ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे अनाथ मुलींसाठी पहिला आश्रम सुरु केला. माईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार व निराश्रित मुला-मुलींसाठी समर्पित केले. आज स्थितीत आश्रमात जवळपास ७५ मुली शिक्षण घेत असून, त्यातील काही मुली आता स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. या संस्थेमार्फत मुलींचे शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसन करण्यात येते. पोलिसात तक्रार दाखल करा: ममता सिंधुताई सपकाळ

दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत, त्यांना कशाचीही भीती का बरे वाटत नसेल? मध्यंतरी आम्ही एक व्हिडीओ करून त्याद्वारे हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आजच्या समाजाचं चित्रच इतकं विदारक आहे की, लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा जाहिरातींना लोकं बळी पडताना दिसत आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. कुणालाही अशा प्रकारचे आमिष देऊन पैशांची मागणी केली, तर तत्काळ नजीकच्या पोलिसात तक्रार दाखल करा, असे आवाहन ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड