शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

प्रवासी युवतीचा ड्रायव्हरकडून विनयभंग;आरोपी ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 3:18 PM

तब्बल दहा दिवसांनी झाला गंभीर गुन्हा दाखल 

ठळक मुद्देआरोपी ड्रायव्हरविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल  

पुणे : ट्रॅव्हल बसमध्ये प्रवासात सीटवर झोपलेल्या युवतीच्या कंबरेत हात घालून तिचा विनयभंग करणार्‍या चालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र शर्मा असे या ड्रायव्हरने हे गैरकृत्य केले असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. पीडित युवती 7 फेब्रुवारी रोजी भंडाऱ्यावरून पुण्याला येत होती. महिंद्रा ट्रॅव्हल (सीजी 19 एफ 0280)मधून प्रवास करत असताना तिला झोप लागली होती. अचानक तिच्या कमेरेत कोणी तरी हात घातल्याचे तिला जाणवले. शेजारी बसचा ड्रायव्हर राजेंद्र शर्मा हा उभा होता. यावर पीडित युवतीने त्याला विचारणा केली असता, मी अनेक वेळा असे केले आहे. आतापर्यंत अनेक मुलींसोबत मी झोपून आलो आहे. कोणीही मला अडवले नाही. असे निर्लज्जपणे म्हणत पीडित युवतीचा विनयभंग केला.  त्यानंतर ती खराडी येथे उतरून घरी गेली. या गंभीर प्रकरणी युवतीने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदरचा गुन्हा त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशनला वर्ग केला.बुधवारी (दि.17)रोजी रात्री विमानतळ पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आठरे करीत आहेत.  तब्बल दहा दिवसांनी झाला गंभीर गुन्हा दाखल ड्रायव्हरने विनयभंग केल्याची गंभीर घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. 7 फेब्रुवारी रोजी घटना घडल्यानंतर पीडित युवतीने दुसर्‍या दिवशी लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. मात्र या गंभीर घटनेबाबत पुन्हा हद्दीचे कारण देत गुन्हा नेमका कुठे घडला? कुठे सुरू झाला? युवती बस मधून कुठे उतरली? या बाबींवर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयात पाठवला. तब्बल दहा दिवसांनी विमानतळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंग