शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांची उडाली तारांबळ! आज सकाळपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 11:18 IST

शहरातील सर्व पेठा, वडगाव, धायरी, हडपसर, कोथरूड, वानवडी, औंध, सर्वच ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस

ठळक मुद्देसकाळी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी

पुणे: पुण्यात चार, पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. काल रात्री शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हलका पाऊसही झाला. पण आज सकाळपासूनच पावसाने शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच, उपनगरातही हजेरी लावली. पुणेकर कामासाठी बाहेर पडले असताना अशा मध्यम स्वरूपाच्या पावसाने तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. 

शहरातील सर्व पेठा, वडगाव, धायरी, हडपसर, कोथरूड, वानवडी, औंध, सर्वच ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. सकाळी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी दिसून आली. रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते. काही रस्तेही घसरडे झाले होते. वाहतूक कोंडीने रस्त्यांवर छोटे अपघातही घडत होते. काही ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यांची कामे चालू असल्याने नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पुण्यात आजपासून हलक्या पावसाची शक्यता

पुणे शहरात काल दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र, त्यात जोर नव्हता. शहरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस 

मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत पसरले असल्याने कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

मराठवाड्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र