शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 11:42 AM

Lok Sabh Elections 2024 Lalu Prasad Yadav And Narendra Modi : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव निवडणुकीत सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. याच दरम्यान, एकीकडे नेते निवडणुकीच्या सभा घेत आहेत तर दुसरीकडे एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. या निवडणुकीत आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादवही सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

मोदींचे आवडते शब्द कोणते आहेत हे लालू प्रसाद यादव यांनी खोचक टोला लगावत सांगितले आहेत. "देशवासियांना नमस्कार! आज हिंदी भाषेत सुमारे 1.5 लाख शब्द बोलले जातात आणि अभ्यासाच्या सर्व शाखांमध्ये तांत्रिक शब्दांसह सुमारे 6.5 लाख शब्द आहेत, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात आवडते शब्द आहेत - पाकिस्तान, स्मशानभूमी, कब्रिस्तान, हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद, मासे-मुघल, मंगळसूत्र, गाई-म्हशी."

"वरील यादी पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांपर्यंतची आहे. सातव्या टप्प्यापर्यंत या यादीत काही दोन-चार नावं आणखी जोडली जाऊ शकतात. नोकरी-रोजगार, गरीबी-शेतकरी, महागाई-बेरोजगारी, विकास- गुंतवणूक, विद्यार्थी, विज्ञान, युवक इत्यादी मुद्दे ते विसरले आहेत" असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 

लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तेजस्वी यादव आपल्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींचं जुनं विधान माईकवर सर्वांना ऐकवलं आहेत. आता ते ना नोकऱ्यांबद्दल बोलतात, ना महागाईबद्दल, ना बेरोजगारीबद्दल, ना गरिबीबद्दल. तसेच विकासावरही बोलू शकत नाहीत असं म्हणत निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा