शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील बिबवेवाडीत दहशत निर्माण करणाऱ्या हळंदे टोळीवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 18:35 IST

दर्शन हळंदे याने आपल्या इतर ५ साथीदारांच्या सोबत संघटित टोळी तयार केली होती

ठळक मुद्देगंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करुन लोकांमध्ये दहशत पसरवित आहे

पुणे: बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणार्‍या दर्शन हंळदे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दर्शन युवराज हळंदे (वय २१, रा. राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि रोहन ऊर्फ मोन्या बाळु सातपुते (वय १८, रा. शिवशंभो नगर, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्यचा इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहेत. 

दर्शन हळंदे याने आपल्या इतर ५ साथीदारांच्या सोबत संघटित टोळी तयार केली. १५ मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याने मॉन्टी कालेकर याच्यावर तलवार उगारली. इतर ३ ते ४ जणांनी हातामध्ये बाटल्या व दगड घेऊन मॉन्टी कालेकर याला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकाने आकाश खोपडे याच्या दिशेने बाटली फेकून मारली. ती आकाश याच्या डोक्याला लागून तो जखमी झाला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

टोळीवर दंगा, मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे 

दर्शन हळंदे याने संघटित टोळी तयार केली असून त्यांनी हमरस्त्यावर गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करुन लोकांमध्ये दहशत पसरवित आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मान्यता दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे हे अधिक तपास करीत आहेत. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात मोक्का अंतर्गत केलेली ही ३२ वी कारवाई असून या वर्षातील ही २७ वी कारवाई आहे.

टॅग्स :PuneपुणेBibvewadiबिबवेवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक