चुकीचा पासवर्ड टाकल्याने मोबाइल चोरटे जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 02:00 IST2018-11-13T01:59:50+5:302018-11-13T02:00:22+5:30
मंडई परिसरात चिखली पोलिसांना दोन जण संशयितरीत्या आढळून आले. त्यांना हटकले. अंगझडती घेतली असता

चुकीचा पासवर्ड टाकल्याने मोबाइल चोरटे जाळ्यात
पिंपरी : मंडई परिसरात चिखली पोलिसांना दोन जण संशयितरीत्या आढळून आले. त्यांना हटकले. अंगझडती घेतली असता, त्यांच्यापैकी एकाकडे मोबाइल आढळून आला. पोलिसांनी पासवर्ड टाकून मोबाइल स्क्रीन उघडण्यास सांगितले. मात्र, चोरीचा मोबाइल असल्याने त्यांना पासवर्ड माहीत नव्हता. ते मोबाइल स्क्रीन उघडू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, चोरीचा मोबाइल असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे.
चिखली पोलिसांनी नाकाबंदी केली असता, दोन जण शनिवारी रात्री चिखलीतील मंडईजवळ दुचाकीवरून संश्यितरीत्या वावरत होते. गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक संदीप बांदल यांच्या पथकाने त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला.