शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला अजूनही सापडेना विरोधकाचा सूर

By admin | Updated: June 18, 2015 00:13 IST

महापालिकेच्या कारभारातील चार वर्षे संपत आली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांना विरोधकाच्या भूमिकेचा सूर सापडलेला नाही.

पुणे : महापालिकेच्या कारभारातील चार वर्षे संपत आली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांना विरोधकाच्या भूमिकेचा सूर सापडलेला नाही. त्याविषयी राज ठाकरे यांनी मुंबर्ईत नुकत्याच झालेल्या बैठकीत नगरसेवकांना धारेवर धरले. आता तरी विरोधकांची भूमिका बजावा; अन्यथा पुणेकरांना आगामी निवडणुकीत काय उत्तर देणार, असा सवाल केला. महापालिकेतील २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनंतरचे संख्याबळ असलेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी मिळाली. मात्र, पुणेकरांनी विरोधकांची भूमिका बजाविण्यासाठी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यात मनसेच्या नगरसेवकांना अद्याप यश आलेले नाही. महापालिकेतील विविध विषयांवरून भूमिका बदलत गेल्या. कधी राष्ट्रवादी-काँग्रेस, तर कधी युतीला पाठिंबा दिला. महापालिकेच्या स्थायी, विषय समिती व प्रभाग समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीला थेट पाठिंबा देऊन मनसेच्या नगरसेवकांनी विविध पदे पदरात पाडून घेतली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत काही वरिष्ठ नगरसेवकांनी पक्षातील इतर नगरसेवक व नगरसेविकांना विश्वासात घेतले नाही. केवळ मुंबईवरून आदेश असल्याचे सांगून ऐनवेळी सभागृहात व समितीमध्ये भूमिका घ्यावी लागते. महापालिकेच्या अर्थसंकल्पातही सात ते आठ वरिष्ठ नगरसेवक जादा निधी आपल्या पदरात पाडून घेतात. मात्र, इतर सहकारी नगरसेवकांकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारीचा पाढा नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्या पुढे वाचून दाखविला. त्या वेळी राज ठाकरे यांनी मनसे गटनेत्यांसह काही वरिष्ठ पदाधिकारी व नगरसेवकांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)