शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने सदस्यपदाच्या दोन्ही जागा गमाविल्या

By admin | Updated: May 21, 2015 01:40 IST

महापालिकेच्या विधी समिती व शहर सुधारणा समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नशिबाने मिळालेल्या सदस्यपदाच्या दोन जागा गमाविल्या आहेत.

पुणे : महापालिकेच्या विधी समिती व शहर सुधारणा समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नशिबाने मिळालेल्या सदस्यपदाच्या दोन जागा गमाविल्या आहेत. या जागांवर काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून आघाडी तुटलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुन्हा एकत्र आले आहेत.विविध समित्यांवरील सदस्यपदाची निवड पक्षीय बलानुसार केली गेली. मात्र, काँग्रेस व मनसेचे सभागृहातील सदस्य समान असल्याने समितीच्या एका सदस्यासाठी निवडणूक घ्यावी लागणार होती. मात्र, काँग्रेसने मनसेचे सदस्य निवडण्यास मंजुरी दिली. त्या वेळी स्वीकृत सदस्य बाळा शेडगे यांची विधी समिती व शहर सुधारणा समितीवर निवड केली होती. मनसेतून शेडगे यांच्या निवडीला जोरदार विरोध झाल्याने त्यांनी महापौरांकडे समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन पदांसाठी बुधवारी निवडणूक झाली. विधी समितीसाठी मनसेकडून युंगधरा चाकणकर, तर काँग्रेसकडून सुनंदा गडाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नुकतेच प्रभाग समितीमधील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही युती नसल्याचे मनसेने जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि मनसेचे उमेदवार असल्याने राष्ट्रवादी कोणाला मतदान करणार याबाबत उत्सुकता होती. ४मनसेने साथ सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना व भाजपाचे सदस्य या निवडणुकीत तटस्थ राहिले. सुनंदा गडाळे यांना ४६, तर युंगधरा चाकणकर यांना २० मते पडली. गडाळे या २६ मतांनी निवडून आल्या. ४त्यानंतर शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदासाठी काँग्रेसकडून दत्ता बहिरट व मनसेकडून अस्मिता शिंदे यांनी अर्ज दाखल केले. बहिरट यांना ४८,तर शिंदे यांना २१ मते पडली. बहिरट हे २७ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी व काँग्रेसने गळयात गळे घातल्यामुळे मनसे एकाकी पडली.