मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:09 PM2021-05-03T16:09:32+5:302021-05-03T16:16:28+5:30

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi | मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

googlenewsNext

पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून ओला सुखा कचरा फाईल व टेबलांवर टाकून शासकीय कामात अडथळा आणणारे मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता वानवडीपोलिसांनी बाबर व इतरांना अटक केली. 

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकत्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वत: नगरसेवक असतानाही बाबर यांनी तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखालीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रिय कार्यालयात सोमवारी २२ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता. 

सहायक आयुक्त किशोरी शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रभागांतील स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. याची साईनाथ बाबर यांनी गोरख इंगळे याच्याकरवी फोन करुन माहिती घेतली. शिंदे या कार्यालयात नाहीत, हे लक्षात आल्यावर बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधिक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे, अशी विचार केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले. कार्यालयात सोबत आणलेला ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. पुन्हा कार्यालयातील संपूर्ण लॉबीमध्ये देखील कचरा घाण केली. तसेच कार्यालयातील इतर सहकाऱ्यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फायलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला. तसेच कोविड १९चे कोणत्याही नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी साईनाथ बाबर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर आता वानवडी पोलिसांनी रविवारी रात्री नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक केली. पोलिसांनी बाबर यांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांच्यासमोर हजर केले. त्यांनी १५ हजार रुपयांच्या जामिनावर बाबर इतर कार्यकर्त्यांची सुटका केली. सर्वांच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. रुपाली पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.