शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यातील लाचखोर डीन विरोधात मनसे आक्रमक; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 14:24 IST

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कॉलेजमध्ये काँगेसकडून शाईफेक आंदोलन तर मनसेकडून डीनच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : पुणे महापालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना अधिष्ठाताला (डीन) रंगेहाथ पकडण्यात आले होते. पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली. डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय ५४ वर्ष, डीन (वर्ग-१) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.

याबाबत आता पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मनसे आक्रमक झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी डीन बनगिनवारच्या ऑफिसमध्ये जाऊन संगणकाची तोडफोड केली आहे. डीनच्या खुर्चीला पैशाचा हार घालून निषेधाच्या घोषणाही दिल्या आहेत. काँग्रेसकडूनही  शाई फेक आंदोलन करत काँग्रेसकडून महाविद्यालयाच्या डीनचा निषेध करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि कार्यकर्त्यांनी डीन कार्यालयावर शाई फेकली आहे. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी लाच घेणाऱ्या दिनविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परीक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल काेट्यामधून निवड झाली होती. त्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी १६ लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.

दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. या वैद्यकीय महाविद्यालयात सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलनMNSमनसेcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण