Chandrakant Patil: ‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:59 IST2026-04-06T11:55:46+5:302026-04-06T11:59:17+5:30

कामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तयारीही पाटील यांनी दर्शवली आहे

'MNGL' gas connection should be made available immediately; Chandrakant Patil's instructions | Chandrakant Patil: ‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

Chandrakant Patil: ‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

कोथरूड : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पाइप नॅचरल गॅस (पीएनजी) च्या मागणीत मोठी वाढ झाली असून, नागरिकांना नवीन जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

या पार्श्वभूमीवर एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोथरुड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे शहरात पीएनजी पुरवठा सुरळीत आणि विनाव्यत्यय सुरू राहावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान एमएनजीएलचे संचालक कुमार शंकर, व्यावसायिक संचालक शंकर करजगी, स्वतंत्र संचालक बागेश्री मंठाळकर, उपाध्यक्ष शत्रुघ्न सिंह तसेच रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे आदी उपस्थित होते.

सुरुवातीला शहरातील गॅसपुरवठा, तांत्रिक अडचणी आणि वाढती मागणी याबाबत पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली. युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक वाढलेल्या मागणीचा विचार करून नागरिकांशी समन्वय साधत विविध भागांत पाइपलाइनचे जाळे जलदगतीने उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, जोडणी देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : चंद्रकांत पाटिल ने एमएनजीएल गैस कनेक्शन तुरंत उपलब्ध कराने का आग्रह किया।

Web Summary : युद्धग्रस्त क्षेत्रों से मांग बढ़ने पर चंद्रकांत पाटिल ने एमएनजीएल को नए गैस कनेक्शन में तेजी लाने का निर्देश दिया। उन्होंने जनशक्ति सहायता की पेशकश की और पुणे में आपूर्ति स्थिरता की समीक्षा की, पाइपलाइन विस्तार और नागरिक समन्वय पर जोर दिया।

Web Title : Chandrakant Patil Urges Swift MNGL Gas Connections Amid Rising Demand.

Web Summary : Chandrakant Patil directed MNGL to expedite new gas connections due to increased demand from war-torn regions. He offered manpower assistance and reviewed supply stability in Pune, emphasizing swift pipeline expansion and citizen coordination.