शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून मित्राचा केला खून

By admin | Updated: May 25, 2015 05:42 IST

कुऱ्हाड व्यवस्थित बनवून दिली नाही,या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले व त्यातून २ जणांनी एकास लोखंडी गजाच्या

लोणी काळभोर : कुऱ्हाड व्यवस्थित बनवून दिली नाही,या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले व त्यातून २ जणांनी एकास लोखंडी गजाच्या साह्याने ठार मारले. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या तासाच्या आत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. या प्रकरणी मयताचे वडील सुरेश हरीभाऊ साळुंखे (वय ४० वर्षे, रा. सिद्राममळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर. मूळ रा. कऱ्हा वाघज, ता. बारामती.) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. नागेश्वर सुरेश साळुंखे (वय १८ वर्षे) या तरुणाचा खून झाला असून भानूदास हनुमंत लिंगे (वय २२ वर्षे) व संजय मुखहरी चव्हाण (वय ३० वर्षे, दोघे रा. सिद्र्राममळा, नांदेपाटील वस्ती, लोणी काळभोर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. साळुंखे कुटुंबाचा घिसाडी काम करण्याचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी लिंगे याने नागेश्वरकडे एक कुऱ्हाड तयार करण्यासाठी दिली होती. ती व्यवस्थित तयार करून न दिल्याने लिंगे नागेश्वरवर नाराज होता. शनिवार २३ मे रोजी नागेश्वर, लिंगे व चव्हाण या मित्रांनी अतिमद्यपान केले. दारू पिऊन झाल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी कारणांवरून चव्हाण व नागेश्वर या दोघांची बाचाबाची झाली. याचवेळी लिंगे याने कुऱ्हाडीचा विषय काढला. तिघांचा वाद वाढल्यानंतर लिंगे याने दुचाकीला अडकवलेला गज काढला व तो नागेश्वरच्या डाव्या कानाच्या मागील बाजूस व कपाळावर मारला. वर्मी घाव बसल्याने नागेश्वर खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत सोडून दोघे घरी निघून गेले. आज सकाळी हा प्रकार समजल्यानंतर पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथक घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांना नागेश्वर मृतावस्थेत आढळून आला. चौकशी केली असता नागेश्वर सोबत भानूदास लिंगे व संजय चव्हाण असल्याची माहिती मिळताच दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदर खून आपणच केला असल्याची त्यांनी कबुली दिली. एक तासाच्या आत खुन्यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथकाचे कौतुक करण्यात येत आहे. (वार्ताहर)